Ratra Kali Ghagar Kali C.T. Khanolkar

ISBN:

Published: 1963

Paperback

200 pages


Description

Ratra Kali Ghagar Kali  by  C.T. Khanolkar

Ratra Kali Ghagar Kali by C.T. Khanolkar
1963 | Paperback | PDF, EPUB, FB2, DjVu, talking book, mp3, RTF | 200 pages | ISBN: | 3.53 Mb

एखादी नवी कोरी, रेखीव घागर अचानक प्रवाहात वाहून जावी. पाण्याने भरून जाण्याऐवजी त्या प्रवाहात वेडी वाकडी, इकडे तिकडे ती घागर उपडी वाहत जावी, कधीही पाण्याने पूर्ण न भरता.रात्र काळी, घागर काळीमधील लक्ष्मी ही अशीच सौंदर्याचं देणं लाभलेली पण अतृप्त स्त्री. तिच्या आजुबाजूला येणारा प्रत्येक पुरुष तिच्या सौंदर्यावर भाळतो पण एखादा शाप असल्यासारखं त्यातलं कुणीच तिची तृष्णा भागू शकत नाही. घागर रिकामीच राहते. अश्या रिकाम्या घागरीत काळ्या रात्रीसारखा नुसता अंधार धुमसत, फुसफुसत राहतो. आणि तो अंधार आजूबाजूच्या कित्येकांना गिळंकृत करतो. नुसती लक्ष्मीच नाही तर यातली जवळ जवळ प्रत्येक स्त्री (जाई, बकुल, कुसुम, अनुसूया ) अशीच कशासाठी तरी तृषित आहे.इथपर्यंत सर्व ठीक आहे.

पण कादंबरीतला जवळ जवळ प्रत्येक पुरुष हा वासनाग्रस्त, लंपट, पोकळ म्हणूनच समोर येतो. जो नाही तो वेडा, फकीर, भिक्षुक आहे. ही थोडी अतिशययोक्ती वाटते. असो. कदाचित ज्या काळी मनाला करमणुकीसाठी आजच्या सारखी इतर काही साधनं हाताशी नव्हती तेव्हा मानवी मुलभूत गरजा भागवणे हाच एक विरंगुळा असावा.खानोलकर यांचं लेखन कोकणावर लिहिण्यास अगदी अनुरूप आहे.

पण तेही कोकणाचं आणि तिकडच्या माणसाचं एकतर्फी भकास, भयाण दर्शनच जास्त घडवतं. त्यांच्या कवितेतून जीवनाची कधी रक्त ओकायला लावणारी दगडी वाट दिसते तर कधी कळ्या, ओळी पाने दिसतात, विस्तीर्ण पोकळीचा एखादा गंधार सापडतो. कथा-कादंबरीतून मात्र त्यांनी ती भावूक, तरल, सौंदर्याची बाजू कधी साधलीच नाही अशी खंत वाटते.Enter the sum

Related Archive BooksRelated Books


Comments

Comments for "Ratra Kali Ghagar Kali":


profoundhistory.com

©2011-2015 | DMCA | Contact us